माध्यमांनी खातरजमा न करता बातम्या देणे चुकीचे : नॉट रीचेबलच्या बातमीवर अजितदादा भडकले


It is wrong for the media to give news without verification : Ajit Dada was outraged by the news of not reachable मुंबई : काल अजितदादा नॉट रीचेबल असल्याच्या माध्यमांनी बातम्या झळकावल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली मात्र अजितदादांनी याबाबतचे कारण स्पष्ट करीत माध्यमांनी खातरजमा न करता दिलेल्या बातमीवर तीव्र नाराजी व्यक्त केली. काही दिवसांपासून सातत्याने महाराष्ट्रभर दौरे केल्याने विश्रांती व्यवस्थित मिळाली नाही. दौर्‍याची दगदग, झोप व्यवस्थित न मिळाल्याने पित्ताचा त्रास वाढून तब्बेत बिघडली त्यामुळे दौरा सोडून डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधे घेऊन पुण्यातल्या जिजाई निवासस्थानी विश्रांती घेत होतो, अशी माहिती विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दिली. माध्यमांनी ‘नॉट रिचेबल’च्या चुकीच्या बातम्या दाखवल्यामुळे माझी विनाकारण बदनामी झाल्याने ाराजी व्यक्त करत यापुढे माध्यमांनी खात्रीकरुनच बातम्या दाखवण्याची सूचना त्यांनी केली.

दादा म्हणाले, माध्यमांची भूमिका योग्य नाही
अजितदादा म्हणाले, काल एका कार्यक्रमासाठी जात असताना मला प्रवासातच अ‍ॅससिडीटी जाणवली शिवाय दोन-तीन दिवस प्रवास, कार्यक्रम, दगदग यामुळे पित्ताचा त्रास असह्य झाल्याने मी पुढचे दौरे रद्द करून डॉक्टरांकडे गेलो आणि आराम करणे पसंत केले. आता माध्यमांनी लगेच अजित पवार नॉट रीचेबल अशा बातम्या चालवल्या. हे योग्य नाही. उगाच राईचा पर्वत माध्यमे करत आहेत असे अजित पवारांनी स्पष्ट केले. पुण्यातील खाजगी कार्यक्रमात दादा आल्यानंतर त्यांनी स्पष्टपणे माध्यमांवर नाराजी व्यक्त केली.

चुकीच्या बातम्यांमुळे मनस्ताप
कोणतीही खातरजमा न करता एखाद्याची किती बदनामी करायची याला काही लिमीट असते. माध्यमात माझ्याविषयी आलेल्या बातम्या बघून मी व्यथित झालो. आम्ही पब्लिक फिगर असल्याने आमच्या विषयी बातम्या करण्याचा माध्यमांना अधिकार आहे. मात्र कोणतीही खातरजमा न करता चुकीच्या बातम्या चालविणे योग्य नाही अशा शब्दात आपली नाराजी व्यक्त करत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी माध्यमांनी खात्रीकरुनच यापुढे बातम्या चालविण्याची सूचना माध्यमांना केली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !