बोदवड शहरातून भरदिवसा दुचाकी लांबवली
बोदवड : शहरातील तहसील कार्यालयासमोरून चोरट्यांनी 30 हजार रुपये किंमतीची दुचाकी लांबवली. या प्रकरणी बोदवड पोलिसात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
तहसीलजवळून लांबवली दुचाकी
योगराज लक्ष्मण लोहार (52, मानकबाग, गजानन महाराज नगर, भुसावळ) यांनी तहसील कार्यालयाच्या चॅनल गेटसमोर दुचाकी (एम.एच.19 डी.एफ.3867) ही उभी केली असता बुधवार, 5 रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास चोरट्यांनी दुचाकी लांबवली. तपास हवालदार युनूस तडवी करीत आहेत.
