वाद विकोपाला गेल्यानंतर पत्नीची चाकू भोसकून हत्या : ‘या’ शहरात उडाली खळबळ


वाडी : कौटुंबिक वाद विकोपाला गेल्यानंतर संतप्त पतीने पत्नीर चाकूने वार करीत हत्या केली. वाडी, ता.नागपूर ग्रामीण शहरातील नवनीतनगरात गुरुवारी रात्री ही घटना घडली तर शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. आरोपी पतीस आर्वी (जिल्हा वर्धा) येथून अटक करण्यात आली. माधुरी मनोज सरोदे (40) असे मृत पत्नीचे, तर मनोज ज्ञानेश्वर सरोदे (50) अटक करण्यात आलेल्या आरोपी पतीचे नाव आहे.

कौटुंबिक वादातून घटना
मनोज मूळचा आर्वी येथील रहिवासी असून, तो मागील सहा महिन्यांपासून वाडी शहरातील नवनीतनगरात बालपांडे यांच्या घरी किरायाने राहतो. तो एमआयडीसी परिसरातील केबल कंपनीमध्ये तर माधुरी सिंपलेक्स कंपनीत कामगार म्हणून काम करायची. त्याला दारूचे व्यसन होते. माधुरीच्या डोके, पोट व तोंडावर चाकूने वार केल्याच्या जखमा असल्याने तिचा खून करण्यात आल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट झाले.हा प्रकार उघड होताच शेजार्‍यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिस उपायुक्त अनुराग जैन, सहायक आयुक्त प्रवीण तिजाडे, पोलिस निरीक्षक प्रदीप रायण्णावर यांनी घटनास्थळ गाठून पाहणी करीत पंचनामा केला.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !