ममुराबादच्या तरुणाची गळफास घेत आत्महत्या


ममुराबाद : गावातील 33 वर्षीय तरूणाने राहत्या घरामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शनिवारी सायंकाळी पाच वाजता उघडकीस आली. आत्महत्येचे कारण समजून आलेले नसून याप्रकरणी तालुका पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. जगदीश लक्ष्मण पाटील (33) असे मयताचे नाव आहे.

आत्महत्येचे कारण अस्पष्ट
जगदीश हा ममुराबाद येथे आई-वडीलांसह वास्तव्यास होता. तो जळगावातील एका कंपनीत कामगार म्हणून कामाला होता. शनिवारी घरात कुणीही नसताना त्याने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविली. सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास कुटूंबिय घरी आल्यानंतर त्यांना मुलाचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आल्यानंतर त्यांनी एकच आक्रोश केला. त्यानंतर ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह खाली उतरवून जिल्हा रूग्णालयात हलविण्यात आला. याठिकाणी वैद्यकीय अधिका-यांनी तपासणीअंती जगदीश याला मृत घोषित केले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !