जळगावात आठ लाखांची गुरांची चामडी व हाडे जप्त : दोघांना अटक
Cow skin and bones worth eight lakh seized in Jalgaon : Two arrested जळगाव : एमआयडीसी पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे शहरातील सुप्रीम कॉलनीत छापा टाकून एका गोदामातून गुरांच्या चामडीसह हाडांची साठवणूक करणार्या तिघांवर कारवाई करीत आठ लाख तीन हजार 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना अटक करण्यात आली.
गोपनीय माहितीवरून कारवाई
सुप्रीम कॉलनीत ममता बेकरीजवळ एका पत्र्याच्या शेडमध्ये गुरांची चामडी साठवून ठेवण्यात आल्याची एमआयडीसी निरीक्षक जयपाल हिरे यांना मिळाल्यानंतर त्यांनी कारवाईचे आदेश दिले होते. पोलीस उपनिरीक्षक दीपक जगदाळे, पोलीस उपनिरीक्षक आनंदसिंग पाटील, पोलीस नाईक विकास सातदिवे, पंकज पाटील, राहुल रगडे, विशाल कोळी यांच्या पथकाने महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या कर्मचार्यांनाही याबाबतची माहिती देत पथकासह छापा टाकला. तब्बल आठ लाख तीन हजार चारशे रुपये किंमतीची गुरांची चामडी जप्त करण्यात आली तसेच डंपरद्वारे तिची आव्हाणे शिवारात विल्हेवाट लावण्यात आली या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल मुकेश पाटील यांच्या फिर्यादीवरून शेड तसेच जागा मालक सरवत सुलतान शेख कुरेशी यांच्यासह बेकायदेशीरपणे गुरांची चामडी व हाडे साठवून ठेवणार्या अरबाज मुस्ताक कुरेशी, शेख मुजफ्फर शेख मोहम्मद (दोन्ही रा.पिंप्राळा हुडको) यांच्याविरुद्ध एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
