पारोळ्यातील तरुणीवर बलात्कार : एकाविरोधात गुन्हा
Rape of young woman in Parola : Crime against one पारोळा : शासकीय कार्यालयात काम करणार्या 29 वर्षीय तरुणीवर एकाने तीन वर्षांपासून अत्याचार केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे शिवाय तरुणीचा रस्ता अडवत तिला मारहाण करीत विनयभंग केल्याचा प्रकार समोर आल्यानंतर तरुणीने पोलिसात तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला.
35 वर्षीय तरुणाविरोधात गुन्हा
सरकारी कार्यालयात कार्यरत 29 वर्षीय तरुणी शनिवारी दुपारी दिड वाजता कामानिमित्त दुचाकीने जात असताना पारोळा-विचखेडे दरम्यान संशयित समाधान लोटन चौधरी (35, पारोळा) याने त्याची दुचाकी आडवी लावत रस्ता अडवला तसेच तरुणीचा विनयभंग करत धमकी दिली. याबाबत पीडीत तरुणीने पोलिसात धाव घेतली तसेच यापूर्वी अनेकदा संशयिताने अत्याचार केल्याचा आरोप करीत विनयभंग केल्याप्रकरणी तक्रार दिल्यानंतर संशयित समाधान चौधरी विरोधात विविध कलमान्वये पारोळा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास उपनिरीक्षक गंभीर शिंदे करीत आहेत.
