समता नगरात किरकोळ कारणावरून पिता-पूत्रांना मारहाण


In Samata Nagar, father and son were beaten for a minor reason जळगाव : पाण्याची मोटर बंद झाल्याच्या निमित्ताने पिता-पूत्रांना मारहाण झाल्याची घटना समता नगरात घडली. या प्रकरणी शनिवारी रात्री नऊ वाजता रामानंदनगर पोलिसात चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

चौघांविरोधात गुन्हा दाखल
शंकर शालिक सोनवणे (30, समता नगर) हा तरुण आपल्या परीवारासह वास्तव्याला आहे. शनिवार, 8 एप्रिल रोजी दुपारी 12.30 वाजेच्या सुमारास पाण्याच्या मोटारीची वायर निघाल्याने मोटर बंद झाल्याने या कारणावरून त्यांचा शेजारी राहणारे काजल वानखेडे, आदित्य वानखेडे, मनीषा वानखेडे आणि सर्फराज तडवी (सर्व रा.समतानगर) या चौघांनी शंकर सोनवणे आणि त्याचे वडील यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करून धमकी दिली. तसेच यातील एकाने लाकडीकाठी डोक्यात मारून गंभीर दुखापत केली. या घटनेबाबत शंकर शालिक सोनवणे या तरुणाने दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी काजल वानखेडे, आदित्य वानखेडे, मनीषा वानखेडे आणि सर्फराज तडवी या चौघांविरोधात शनिवार, 8 एप्रिल रोजी रात्री नऊ वाजता रामानंदनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेचा पुढील तपास पोलीस नाईक जितेंद्र तावडे करीत आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !