जळगावात दुचाकी चोरीचे सत्र कायम


जळगाव : शहरातील पांडे चौकात असलेल्या मॅटर्निटी हॉस्पिटलजवळून एका वृध्दाची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. या प्रकरणी शनिवारी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा
लिलाधर गरबड कुरकुरे (62, महाबळ कॉलनी, जळगाव) यांनी रविवार, 2 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजता त्यांची दुचाकी (एम.एच.19 ए.क्यू.1322) पांडे चौकातील मॅटर्निटी हॉस्पिटलजवळ पार्क केली. अज्ञात चोरट्याने पार्किंगला लावलेली 25 हजार रुपये किंमतीची दुचाकी लांबवली. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर शनिवारी एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिल्यानंतर अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !