जळगाव कारागृहात कैदी चिन्या जगतापचा मृत्यू : तत्कालीन कारागृह अधीक्षक अखेर निलंबित


अडीच वर्षानंतर निलंबन
11 सप्टेंबर 2020 रोजी जिल्हा कारागृहात झालेल्या मारहाणीत चिन्या उर्फ रवींद्र जगतापचा मृत्यू झाला होता. कारागृह अधीक्षक पेट्रस गायकवाड, तुरुंगधिकारी, कारागृह पोलीस कर्मचारी यांनी मारहाण केल्यानेच त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप चिन्या जगताप यांच्या पत्नी मीना जगताप यांनी केला होता. त्यांनी गुन्हा नोंदवावा म्हणून निवेदन दिले होते मात्र त्याची दखल घेतली जात नव्हती. अखेर मीना जगताप यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. नंतर 14 महिन्यांनी गुन्हा दाखल झाला.

दरम्यान, आता राज्य शासनाने 6 एप्रिल रोजी आदेश काढून पेट्रस गायकवाड यांना निलंबित केले आहे. निलंबन काळात गायकवाड याचे मुख्यालय अहमदनगर कारागृह असेल. पूर्व परवानगीशिवाय त्यांना मुख्यालय सोडता येणार नाही. रोज सकाळी व दुपारी पेट्रस गायकवाड याला हजेरी द्यावी लागणार आहे. निलंबन काळात कुठलीही नोकरी व धंदा करता येणार नसल्याचे आदेशात नमूद आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !