घराकडे का पाहतात म्हटल्याच्या वादातून जळगावात दोघा भावांना मारहाण
जळगाव : घराकडे वारंवार का पाहतात त्यामुळे आमची बहिण घाबरते , असे म्हटल्याच्या रागातून दोघा आरोपींनी भावंडांना मारहाण केल्याचे घटना जळगाव शहरातील शाहू नगरात शनिवारी रात्री आठ वाजता घडली. या प्रकरणी रविवारी जळगाव शहर पोलिसात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
दोघांविरोधात गुन्हा दाखल
मयुर शशिकांत रानवडे (18, शाहु नगर, हनुमान मंदिराजवळ, जळगाव) यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार, संशयित समीर बिहारी आणि सुमेर तडवी (शाहू नगर, जळगाव) यांना दुसरा सोयीस्कर रस्ता असतानाही ते घराजवळून वारंवार जात असल्याने व घराकडे पाहून ढुंकत असल्याने त्याबाबत फिर्यादीचा भाऊ कल्पेशने विचारणा केली असता संशयितानी दोघा भावांना मारहाण केली तसेच प्लास्टीकचा पाईप डोक्यात मारून दुखापत केली. या प्रकरणी मयुर रानवडे याच्या फिर्यादीवरून समीर बिहारी आणि सुमेर तडवी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार उल्हास चर्हाटे करीत आहे.


