जळगावात जुन्या वादातून तरुणावर सुर्‍याने हल्ला


In Jalgaon, a young man was attacked by the sun over an old dispute जळगाव : जुन्या वादातून 21 वर्षीय तरुणावर लोखंडी सुर्‍याने हल्ला करण्यात आला तर संशयीताने दगडफेक करीत मारहाण केल्याची घटना पोलीस कॉलनीजवळील फिरदोस डेअरीजवळ रविवार, 9 रोजी पावणेदोन वाजता घडली. या प्रकरणी चौघांविरोधात एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

जुन्या वादातून केला सुर्‍याने हल्ला
मोहिन खान यासीन खान (21, सुप्रीम कॉलनी, पोलीस कॉलनी, जळगाव) या तरुणाच्या तक्रारीनुसार, रविवार, 9 एप्रिल रोजी दुपारी पावणेदोन वाजता मोहिन हा नमाज पठण करून घराकडे येत असतांना जुन्या भांडणाच्या कारणावरून पोलीस कॉलनीतील फिरदोस डेअरीजवळ संशयित इम्रान खाटीक, रेहान खाटीक, उजेफ खाटीक आणि अफसाना खाटीक (सर्व रा.सुप्रीम कॉलनी, पोलीस कॉलनी, जळगाव) यांनी शिवीगाळ केली तर इम्रान याने कपाळावर लोखंडी सुरा मारून गंभीर दुखापत केली तसेच अन्य संशयीतांनी शिवीगाळ करून मोहिनच्या अंगावर दगडफेक केली. यात मोहिन खान हा गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी रविवारी रात्री 10 वाजता मोहिनच्या तक्रारीवरून चौघा संशयीतांविरोधात एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार महेंद्रसिंग पाटील करीत आहे.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !