विनोद तराळ यांचा राज्य अध्यक्षपदी निवड झाल्याने सत्कार
रावेर : रावेर तालुका अॅग्रो डिलर्स असोसिएशनच्या वतीने महाराष्ट्र राज्य अॅग्रो डिलर्स असोसिएशनया राज्य अध्यक्षपदी जिल्हाध्यक्ष विनोद तराळ तसेच उपाध्यक्षपदी कैलास मालू व राज्य सदस्यपदी राजेंद्र अण्णा पाटील यांची निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. अध्यक्षस्थानी जिल्हा कृषी अधीक्षक संभाजी ठाकूर होते.
यांची व्यासपीठावर उपस्थिती
व्यासपीठावर जिल्हा कृषी अधिकारी मधुकर चौधरी, कृषी सहसंचालक अनिल भोकरे, गुणवत्ता नियंत्रण अधिकारी अरुण तायडे, जिल्हा मोहीम अधिकारी प्रकाश महाजन, जिल्हाध्यक्षविनोद तराळ, कैलास मालू, राजेंद्र अण्णा पाटील, शैलेश काबरा, किरण नेहेते, कन्हैया सोमाणी, राजेशभाई, सुभाष अग्रवाल, तालुका कृषी अधिकारी एस.आर.साळुंके, कृषी अधिकारी एल.ए.पाटील यांच्यासह रावेरचे उद्योजक श्रीराम अग्रवाल, जिल्हा ड्रीप असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष सोपान पाटील आदींची उपस्थिती होती.



पीओएसचा वापर करून विकावीत खते
यावेळी मनोगत व्यक्त करतांना जिल्हा कृषी विकास अधिकारी मधुकर चौधरी यांनी खत नियंत्रण कायद्यातील तरतुदी व विक्रेत्यांनी पीओएसच वापर करूनच खते विण्याबाबत सल्ला दिला. विनोद तराळ यांनी राज्य संघटनेच्या माध्यमातून भविष्यातील करावयाची कामे याबद्दल माहिती दिली तसेच एका बियाणे कंपनीच्या प्रतिनिधींच्या मुजोरीचाही किस्सा सांगितला व भविष्यात अशा कंपनी प्रतिनिधी व कंपन्यांना वठणीवर आणण्यासाठी संघटना सक्षमपणे काम करणार असल्याचे सांगितले. कृषी सहसंचालक अनिल भोकरे यांनी लायसन्स प्रक्रियेत कागदपत्रे कमी व्हावीत, अशी इच्छा व्यक्त केली. कृषी अधीक्षक संभाजी ठाकूर यांनी कृषी विक्रेत्यांच्या परवाना प्रक्रियेबाबत माहिती देत यासाठी लवकरच तालुकावार कॅम्पचे आयोजन करण्याची ग्वाही दिली.
कार्यक्रमा यशस्वीतेसाठी यांचे परीश्रम
कार्यक्रम यशस्वीतेसाठी रावेर अॅग्रो डिलर्स असोसिएशनचे तालुकाध्यक्ष सुनील कोंडे, उपाध्यक्ष सुनील पाटील, सचिव युवराज महाजन, एकनाथ महाजन, डॉ.जी.एम.बोंडे, चंद्रकांत अग्रवाल, सुनील कुलकर्णी, रवींद्र बारी, प्रमोद महाजन, स्वप्नील पाटील, प्रदीप महाजन, जितेंद्र महाजन आदींनी परीश्रम घेतले. सूत्रसंचालन तालुकाध्यक्ष सुनील कोंडे तर आभार संघटना सचिव युवराज महाजन यांनी मानले.
