सासरच्या छळानंतर कुंभारखेड्यात विवाहितेची आत्महत्या : पतीसह तिघांना अटक


Wife’s suicide in Kumbharkheda after torture by father-in-law : Three arrested along with husband रावेर : तालुक्यातील कुंभारखेडा गावातील विवाहितेचा चारीत्र्यावर संशय घेत छळ करण्यात आला तसेच लग्नात राहिलेले दिड लाख रुपये आणावेत म्हणून तगादा लावल्याने यास कंटाळून विवाहितेने आत्महत्या केली. ही घटना शनिवारी रात्री साडेनऊ वाजता कुंभारखेडा येथे घडली. सुरूवातीला या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केल्यानंतर माहेरच्यांनी तक्रार केल्यानंतर पतीसह चौघांविरोधात सावदा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी या प्रकरणी पतीसह जेठ व सासर्‍याला अटक केली आहे. अरुणा मनोज कटोणे (19, धामणगाव तांडे, ता.मुक्ताईनगर, ह.मु.कुंभारखेडा) असे मयत विवाहितेचे नाव आहे.

छळ असह्य झाल्याने विवाहितेचा गळफास
मयत विवाहितेचे वडिल तुळशिराम बाबूराव ईटावल (49, धामणगाव) यांच्या तक्रारीनुसार, त्यांची मुलगी अरुणाचा संशयित मनोज विकास कटोने याच्याशी विवाह झाल्यानंतर पतीसह सासरच्यांनी मुलीच्या चारीत्र्यावर नेहमीच संशय घेतला शिवाय लग्नात राहिलेले हुंड्याचे दिड लाख रुपये आणावेत म्हणून लग्नानंतर तगादा लावला तसेच तिला शिविगाळ करून मारहाण केली तसेच मुलीशी बोलणेही बंद केले. या सर्व प्रकाराला कंटाळून मुलगी अरुणा हिने गळफास घेतला. विवाहितेच्या मृत्यूला कारणीभूत ठरल्या प्रकरणी पती मनोज विकास कटोणे, सासरे विकास पांडुरंग कटोणे, जेठ कृष्णा विकास कटोणे आणि जेठानी रीना कृष्णा कटोणे (सर्व रा. कुंभारखेडा) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहा.निरीक्षक जालिंदर पळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विनोद खांडबहाले करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !