शेमळदा गावातील तरुणाची पूर्णा नदीपुलावरून उडी घेत आत्महत्या
A young man of Shemalda village committed suicide by jumping from the Purna river bridge मुक्ताईनगर : तालुक्यातील शेमळदा गावातील 26 वर्षीय तरुणाने शुक्रवार, 14 रोजी पूर्णा नदीच्या पुलावरून उडी घेत आत्महत्या केली. रविवारी या तरुणाचा मृतदेह पोलिसांना आढळला आहे. योगेश संतोष पाटील (26, शेमळदा) असे मयत तरुणाचे नाव आहे.
आत्महत्येचे कारण अस्पष्ट
तरुणाने आत्महत्या का केली? याचे स्पष्ट कारण कळू शकले नाही. या प्रकरणी मुक्ताईनगर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास पोलीस नाईक धर्मेंद्र विलास ठाकूर करीत आहेत.
