वीज कोसळली अन् होत्याचे नव्हते झाले : बोदवड तालुक्यात 70 हजारांचा मका खाक
Lightning struck and the unthinkable happened: 70,000 maize loss in Bodwad taluka बोदवड : तालुक्यातील चिखली बु.॥ येथे मंगळवारी सायंकाळी वीज कोसळल्याने कापणी केलेला मका जळाला. यात शेतकर्याचे सुमारे 70 हजारांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
अचानक वातावरणात बदल
मंगळवारी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास हवामानात अचानक बदल होऊन जोरात वारा सुटला. त्यानंतर विजांचा कडकडाट सुरू होता. तुरळक पावसाला सुरुवात झाली. यावेळी वीज पडून पंजाबराव माणिकराव सोनोने यांच्या गट क्रं 135/1 शेतात वीज पडली आणि त्यांचा तयार करण्यासाठी कापून ठेवलेला दोन एकर मका कणसांसहीत जळून खाक झाला. यामुळे सोनोने यांचे सुमारे 70 हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे अंदाज आहे. शेजारच्या शेतात जेसीबीचे काम सुरू होते.चालकाने याबाबत सोनोने यांच्याशी संपर्क करून वीज पडल्याबाबत माहिती दिली. या घटनेबाबत तहसीलदार, कृषि अधिकारी यांना शेतकर्याने कळवले तेव्हा त्यांनी बुधवारी पंचनामे करण्यास संबंधित कर्मचार्यांना पाठवण्यात येईल, असे सांगितले. यावेळी शेतात मजूर तथा गुरे ढोरे नसल्याने कोणत्याही प्रकारची जीवीतहानी झाली नाही.
