भुसावळात आरएमएस कर्मचार्याला ऑनलाईन 30 हजारांचा गंडा
भुसावळ : शहरातील दोघांना ऑनलाईन गंडवण्याची घटना ताजी असताना शहरातील आरएमएस विभागात असलेल्या सोपान वामन पाटील यांच्या बँक खात्यातून भामट्याने 30 हजार लांबवल्याचा प्रकार 3 जानेवारीला घडला. या प्रकरणी भुसावळ शहर पोलिस ठाण्यात आयटी अॅक्टनुसार फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. पाटील हे मुंबई येथे गेले असता तेथे त्यांनी ऑनलाईन पेमेंट केल्यानंतर त्यांचा कुणीतरी पीन क्रमांक पाहून बँकेतून पैसे काढले. पाटील यांच्या खात्यातून गुडगाव (दिल्ली) येथून पैसे काढण्यात आल्याचे समोर आले असून या गुन्ह्याचा तपास आता आयटी विभागाकडे सोपवण्यात आला आहे.
