बोदवड शहरात आनंदाचा शिधा वाटप
बोदवड : राज्य सरकारने गुढीपाडवा तसेच भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंतीनिमित्त महाराष्ट्रातील गोरगरीब, श्रीमंत, दलित लोकांना सण-उत्सव साजरे करता यावे व घरात गोड पदार्थ बनवता यावे यासाठी शंभर रुपयात आनंदाचा शिधा देण्याची घोषणा केली होती. या घोषणेनंतर आनंदाचा शिधा तालुकास्तरावर प्राप्त झाल्यानंतर लाभार्थींना वाटपास सुरूवात करण्यात आली. रोशन पाटील यांच्या जामठी रोडवरील रेशन दुकानवर भारतीय जनता पार्टी, बोदवडतर्फे आनंदा शिधा वाटप करण्यात आला.
यांची होती उपस्थिती
बोदवड भाजपा तालुकाध्यक्ष प्रभाकर पाटील, भाजपा नगरसेवक विजुसेठ बडगुजर, तालुका सरचिटणीस अमोल देशमुख, भाजपा महिला मोर्चा जळगाव जिल्हा ग्रामीणच्या जिल्हा उपाध्यक्षा अनिता अग्रवाल, महिला मोर्चा तालुकाध्यक्षा वैशाली कुलकर्णी, युवा मोर्चा तालुका उपाध्यक्ष गणेश लोणारे, युवा मोर्चा शहराध्यक्ष अभिषेक झाबक, संजय अग्रवाल, मधुकर पारधी आदी पदाधिकारी, कार्यकर्ते व रेशन कार्डधारक लाभार्थी उपस्थित होते.
