भुसावळातील नाहाटा महाविद्यालयात ‘महात्मा ते भारतरत्न’ व्याख्यानमाला


भुसावळ : शहरातील विज्ञान पु.ओं.नाहाटा वाणिज्य महाविद्यालयातील नियोजन अभ्यास मंडळ व अर्थशास्त्र विभाग आणि राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीपासून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीपर्यंत व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले. मानवाच्या कल्याणासाठी अहोरात्र झटणारे स्वतःसाठी नाही तर देशासाठी लढणारे आधुनिक निर्माते शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार लिखाण ग्रंथ संपदा प्रचंड अफाट असून ते एक स्वाभिमानी विद्याशील आणि चरित्रशील होते अशी भावना डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त प्रमुख वक्ते डॉ. एस. पी.झनके यांनी व्यक्त केली. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस.व्ही.पाटील होते.

यांची व्यासपीठावर उपस्थिती
प्रमुख पाहुणे म्हणून उपप्राचार्य डॉ.बी.एच.बर्‍हाटे, डॉ.एन.ई.भंगाळे, डॉ.ए.डी गोस्वामी, नियोजन अभ्यास मंडळाचे चेअरमन डॉ.एस.टी.धुम, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ.आर.एस.नाडेकर व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवर घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेत ज्या विद्यार्थ्यांनी बक्षीस मिळविले त्यांना महाराष्ट्राची आर्थिक पाहणी हा ग्रंथ देऊन सन्मानित करण्यात आले. प्रथम- खुशी राजेंद्र चव्हाण, द्वितीय- रुपाली दिगंबर वानखेडे, तृतीय- अर्चना सोपान शिंदे यांनी पटकावला. सूत्रसंचालन डॉ. ललित तायडे यांनी तर आभार प्रा.अक्षरा साबळे यांनी मानले. यशस्वीतेसाठी डॉ.एस.टी.धूम यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा.डॉ.किरण वारके, प्रा.व्ही.ए.सोळुंके, प्रा.शीतल सोनवणे, प्रा.नीता पाटील, प्रा.जे.पी.अडोकार यांनी परीश्रम घेतले.

महामानव विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची 132वी जयंती भुसावळ शहर कॉग्रेस कमिटी तफै साजरी. आज दिनांक 14 एप्रिल 2023रोजी महामानव विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळयास सर्व प्रथम शहर कॉग्रेस कमिटी चे अध्यक्ष रविंद्र निकम यांनी माल्याप्रर्ण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी प्रदेश एस सी विभाग सचिव भगवान मेढे, प्रदेश प्रतिनिधी मो. मुन्वर खान, जिल्हा कॉग्रेस कामगार सेल अध्यक्ष राजेश डोंगरदिवे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी महिला शहर कॉग्रेस अध्यक्ष यास्मिन बी, जिल्हा महिला सचिव राणी खरात, शहर उपाध्यक्ष सुजाता सपकाळे, वंदना चव्हाण, दुर्गा सोनवणे, शहर सरचिटणीस प्रशासन संतोष साळवे, सलिम भाई गवळी शहर सरचिटणीस संघटन शैलेश अहिरे, विलास खरात, शहर उपाध्यक्ष शैलेंद्र नन्नवरे, जानी गवळी, जेष्ठ कॉग्रेस पदाधिकारी जे. बी. कोटेचा, सेवा दल शहर अध्यक्ष संजय खडसे, शहर उपाध्यक्ष अजगर भाई, शहर सचिव मुकुंद नामदास अतुल पान पाटील, संजय पगारे संजय गागुंडे शहर सचिव राम अवतार परदेशी ईत्यादी कार्यकतै उपस्थित होते


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !