नवीन शैक्षणिक धोरणात विद्यार्थ्यांच्या मेंदूला चालना मिळणार

डॉ.चंद्रमौली जोशी : भुसावळातील प.क.कोटेचा विद्यालयात कार्यशाळा


भुसावळ : पुढील वर्षापासून नवीन शैक्षणिक धोरणाचा अवलंब केला जाणार असून त्यात स्टेम म्हणजेच सायन्स टेक्नॉलॉजी इंजीनियरिंग आणि मॅथेमॅटिक्स यावर आधारित अभ्यासक्रमाला महत्त्व देण्यात आले आहे यामुळे विद्यार्थ्यांना पाठांतरापासून सुट्टी होऊन पायाभूत संकल्पना स्वतः समजून घेता येणार आहे. या अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांना सहसंबंध, संवाद, शोध, प्रश्नांची उकल व विचार करणे आणि रचनात्मक कार्य यावर भर देण्यात आला असल्याने विद्यार्थी हा शालेय वातावरणाच्या व्यतिरीक्त व्यावहारीक ज्ञानावरदेखील व प्रात्यक्षिकावर भर देण्यात आल्याने त्याचा अभ्यासक्रमामध्ये कल वाढणार आहे. आवडीनिवडीनुसार विषय निवडण्याचे स्वातंत्र्य विद्यार्थ्यांना मिळणार आहे तसेच परीक्षा ही दोन सत्रात होणार असल्याने विद्यार्थ्यांवर येणारा ताण देखील कमी करता येऊ शकेल नवीन शैक्षणिक धोरण हे विद्यार्थ्यांच्या बुद्धीला चालना देणारे असेल, असे प्रतिपादन रमण सायन्स टेक्नॉलॉजी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ चंद्रमौली माऊली जोशी यांनी येथे केले. शहरातील प.क.कोटीच्या माध्यमिक विद्यालयात रमण सायन्स टेक्नॉलॉजी फाउंडेशन अंतर्गत एपीजे अब्दुल कलाम नॅशनल कौन्सिल ऑफ यंग सायंटिस्टच्या माध्यमातून तीन दिवसीय स्टेमवर आधारित विद्यार्थ्यांचे कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. अध्यक्षस्थानी प.क.कोटेच्या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका संगीता राणे होत्या

यांची व्यासपीठावर उपस्थिती
यावेळी नॅशनल कौन्सिल ऑफ यंग सायंटिस्ट नॅशनल सेक्रेटरी संदीप पाटील, डॉ.पी.एस.कोळी, डॉ.महेंद्र चौधरी, नीलिमा वाघुळदे, उषा रीसर्च सायन्स सेंटरचे अध्यक्ष जीवन महाजन, धीरज चौधरी, नीलिमा पाटील, सुनील वानखेडे आदी उपस्थित होते. नवीन अभ्यासक्रमामध्ये विद्यार्थ्यांना सहज व सोप्या पद्धतीने विज्ञान व गणितातील संकल्पना समजावून सांगण्यात आल्या त्यामुळे रटाळ वाटणारे गणित व विज्ञान हे विषय सोपे होणार आहे यासाठी अशा प्रकारच्या कार्यशाळांचे आयोजन झाल्याने अभ्यासक्रमाव्यतिरीक्त विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून गणितातील सूत्रे व भौमितिक आकृत्या समजून घेता येऊ शकतात , कोटेचा माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका संगीता राणे म्हणाल्या.

दशमान संख्या पद्धतीचा वापर
आज आपण दशमान संख्या पद्धती वापरत आहोत परंतु पुरातन काळामध्ये विविध संख्यां पद्धती होत्या. आजही त्या पद्धती असल्या तरी आपण सर्वांना फक्त दशमान पद्धती माहिती आहे. उच्च शिक्षणासाठी या विविध पद्धतींचा वापर होत असतो. विद्यार्थ्यांनी या संख्या पद्धती जाणून घेतल्या पाहिजे यामुळे भविष्यात त्यांना उच्च शिक्षणाकडे अडचणी येत नाहीत, असे गणिततज्ज्ञ डॉ.पी.एस.कोळी म्हणाले. सूत्रसंचालन सुनील वानखेडे यांनी तर आभार धीरज चौधरी यांनी मानले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !