कोळवद येथून 60 हजार रुपये किंमतीची बैलजोडीची चोरी
A pair of bullocks worth Rs 60,000 was stolen from Kolwad यावल : तालुक्यातील कोळवद येथील शेतकर्याच्या घराबाहेरून 60 हजार रुपये किंमतीची बैल जोडी अज्ञात चोरट्याने लांबवली. सर्वत्रव् शोध घेऊनही बैल जोडी मिळून न आल्याने यावल पोलिसात बैल जोडी चोरी प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.
घराबाहेरून लांबवली बैलजोडी
कोळवद येथील शेतकरी विलास शामराव पाटील यांनी आपली 60 हजार रुपये किंमतीची बैल जोडी आपल्या घराच्या बाहेर बांधली होती मात्र शेतकरी कुटुंब झोपल्यानंतर चोरट्यांनी संधी साधली. बैलजोडीची चोरी झाल्याचा प्रकार सकाळी निदर्शनास आल्यानंतर गावासह परीसरात शोध घेण्यात आला मात्र बैलजोडी कुठेही मिळून आली नाही. यावल पोलीस ठाण्यात विलास शामराव पाटील यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध बैल जोडी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार नितीन चव्हाण करीत आहे.
