अपघातग्रस्त वाहनाजवळ मालक नसल्याची संधी चोरट्यांनी साधली : चार टायर्स लांबवणार्‍यांविरोधात बोदवडला गुन्हा


बोदवड : जुनोने-बोदवड शिवारात अपघात झाल्यानंतर रस्त्यावर उभ्या असलेल्या टाटा पिकअप आईस या वाहनाचे 20 हजार रुपये किंमतीचे चार टायर चोरट्यांनी लांबवली. ही घटना मंगळवारी मध्यरात्री घडली. या प्रकरणी बोदवड पोलिसात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. चालक

अज्ञातांविरोधात पोलिसात गुन्हा
प्रदीप गोकुळसिंग पाटील (32 जुनोने) यांच्या तक्रारीनुसार, टाटा पिकअप एम.एच.04 जीटी 9513 अपघात झाल्यानंतर जुनोने-बोदवड शिवारात उभी असताना चोरट्यांनी संधी साधून 20 हजार रुपये किंमतीचे चार टायर लांबवले. तपास हवालदार सचिन भास्कर चौधरी करीत आहेत.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !