हबीबगंज -धारवाड, जबलपूर- कोइम्बतुर विशेष गाड्या धावणार


भुसावळ : रेल्वे गाड्यांना प्रवाशांची होत असलेली गर्दी लक्षात घेता रेल्वे प्रशासनाकडून हबीबगंज-धारवार आणि जबलपूर-कोइम्बतुर या विशेष साप्ताहिक गाड्यांच्या चालविण्याच्या वेळेत वाढ करण्यात आली आहे. धारवार ही गाडी 28 मार्च तर कोइम्बतुर ही गाडी 2 मार्चपर्यत चालविली जाणार आहे. यामुळे प्रवाशांना या गाड्यांचा फायदा होणार आहे. हबीबगंज – धारवार ही गाडी दर शुक्रवारी 10 जानेवारी ते 27 मार्चपर्यत चालविली जाणार आहे. तर डाऊन धारवार – हबीबगंज विशेष गाडी दर शनिवारी 11 जानेवारी ते 28 मार्ज या काळात चालविली जाणार आहे. ही गाडी होशंगाबाद, इटारसी, खंडवा, भुसावळ, मनमाड, कोपरगाव, नगर, दौड, पुणे, सातारा, कराड, सांगली, मिरज, घाटप्रभा, बेलगम, खानापूर, लोडा येथे थांबणार आहे. अप (02198) अप जबलपूर – कोईम्बतुर ही गाडी दर शनिवारी 11 जानेवारी ते 29 फेब्रुवारीपर्यत चालविली जाणार आहे. तर डाऊन (02197) ही गाडी कोइम्बतुर-जबलपूर दर सोमवारी 13 जानेवारी ते 2 मार्च या काळात चालविणार आहे. ही गाडी नरसिंगपुर , गाडरवारा, पिपरिया, इटारसी, हरदा, खंडवा, भुसावळ, मनमाड, इगतपुरी, पनवेल, रोहा, खेड, चिपळूण, रत्नागिरी, कनकवली, कुदाल, थिवम, कारवार, कुमता, कुंडापूरा, उडुपी, मुल्की, थोकुर, मंगलोर, कसार अगोद, पय्यानुर, कन्नूर, तेल्लीचेरी, वदाकारा, कालीकट , तिरुर, शोनुर, पालघाट, पोधानुर येथे थांबणार आहे. प्रवाशांनी गाडीचा लाभ घ्यावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !