भुसावळ शहरासह तालुक्याचा पाणीप्रश्न न सुटल्यास आमदारांच्या निवास्थानावर जलक्रांती मोर्चा : जगन सोनवणे
Jalkranti Morcha at MLA’s residence if water issue of Bhusawal city and taluka is not resolved: Jagan Sonwane भुसावळ : शहरासह ग्रामीण भागात पाण्यासाठी हाहाःकार माजला असून विद्यमान आमदार व पालकमंत्री राहिलेल्या संजय सावकारे यांना पाणीप्रश्न सोडवण्यात यश आले नाही, असा आरोप संविधान आर्मी राष्ट्रीय अध्यक्ष व पीआपी प्रदेश उपाध्यक्ष जगन सोनवणे यांनी बुधवारी पत्रकार परीषदेत केला. येत्या पंधरा दिवसात पाणीप्रश्न न सुटल्यास आमदार संजय सावकारे यांच्या निवासस्थानी जलक्रांती मोर्चा काढू, असा इशाराही त्यांनी दिला.
अमरावती येथे रेल रोको आंदोलन
अमरावतीचे खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा यांनी प्रशासनाला हाताशी धरून तेथील चळवळीचे कार्यकर्ते राजेश वानखेडे यांच्या खोटे गुन्हे दाखल केले असून या संदर्भात 29 एप्रिल रोजी अमरावती व बडनेरा येथे तिरंगा रेल रोको आंदोलन करणार असल्याचे जगन सोनवणे म्हणाले. दरम्यान, संघटनेतफर्र्े प्रलंबित मागण्यांसाठी 20 रोजी दुपारी 12.30 वाजता रेल रोको आंदोलन करण्यात येणार आहे.

टँकरनेही मिळत नाही पाणी
शहरात टँकरद्वारे पाण्याची मागणी होत असतानाही टँकरनेही पाणी मिळत नाही, हे शहरवासीयांचे दुर्दैव असल्याचे जगन सोनवणे म्हणाले. यावेळी माजी नगरसेवक संविधान आर्मी राष्ट्रीय अध्यक्ष व पीआपी प्रदेश उपाध्यक्ष जगन सोनवणे, संविधान आर्मी प्रदेशाध्यक्ष राकेश बग्गन, भुसावळ तालुकाध्यक्ष संघपाल किर्तीकर, शशी तायडे, मनोज तायडे, सतीश ठाकणे, पीआरपी जळगाव जिल्हाध्यक्ष आरीफ शेख, सचिन बार्हे, सुनील मेहता, अरुण कोळी, प्रकाश नाले, समाधान को3ळी, मधू पाटील, गणेश देशमुख आदींची उपस्थिती होती.
