डांभूर्णीतील 55 वर्षीय इसमाची विषारी पदार्थ सेवन करून आत्महत्या


यावल : तालुक्यातील डांभूर्णी येथील 55 वर्षीय इसमाने राहत्या घरात विषारी पदार्थ सेवन केले. त्यांना जळगाव जिल्हा रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले असता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

आत्महत्येचे कारण अस्प्षट
श्रावण लक्ष्मण कोळी (55) असे मयताचे नाव आहे. कोळी यांनी आपल्या राहत्या घरी विषारी पदार्थ सेवन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. हा प्रकार कुटुंबीयांच्या निदर्शनास येताच त्यांना तातडीने जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले मात्र उपचार सुरू असताना दुसर्‍या दिवशी त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी वैद्यकीय अधिकारी डॉ.चंदन महाजन यांनी दिलेल्या खबरीवरून यावल पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली, तपास हवालदार शामकांत बोरसे करीत आहे. प्रौढाने आत्महत्या का केली? याचे कारण कळू शकले नाही.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !