दुचाकी घसरून पडल्याने नायगावातील 18 वर्षीय तरूण गंभीर
यावल : तालुक्यातील विरावली रस्त्यावर दुचाकी घसरून झालेल्या अपघातात एक 18 वर्षीय तरूण गंभीर जखमी झाला. जखमी तरुण हा नायगाव येथील रहिवासी आहे. त्याच्यावर यावल ग्रामीण रुग्णालयात प्रथमोपचार करून जळगावी हलवण्यात आले.
तरुणाच्या डोक्याला दुखापत
विरावली ते यावल रस्त्यावरून अलाउद्दीन अजीज तडवी (18) हा तरुण येत असताना खड्डे चुकवतांना दुचाकी घसरली व अपघात घडला. या अपघातात अलाउद्दीन हा गंभीर जखमी झाला. घटनास्थळावरून त्यास तातडीने यावल ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले असता डॉ.मोहिनी भुगवळे, अधिपरीचारीका ज्योत्ना निंबाळकर, सुमन राऊत बापू महाजन आदींनी प्रथमोपचार केले. तरुणाच्या डोक्यास दुखापत असल्याने त्याला पुढील उपचारार्थ जळगाव जिल्हा शासकिय वैद्यकिय महाविद्यालयात हलवण्यात आले.
