भुसावळातील महेश नगरात घरफोडी : 68 हजारांचा ऐवज लंपास
Burglary in Mahesh Nagar in Bhusawal : 68 thousand in lieu of compensation भुसावळ : शहरातील महेश नगरात घर बंद असल्याची संधी चोरट्यांनी साधत 68 हजारांचा ऐवज लांवबला. या प्रकरणी बाजारपेठ पोलिसात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा
लिला संतोष प्रजापती (63, प्लॉट नंबर 27, महेश नगर, भुसावळ) या शहरातील महेश नगरात कुटूंबासह वास्तव्यास आहेत. प्रजापती कुटूंब गावाला गेल्याने घराला कुलूप असल्याची संधी चोरट्यांनी 18 ते 19 एप्रिल दरम्यान साधली. चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश करीत कपाटातील 10 ग्रॅम वजनाचे व 20 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे टॉप्स, 20 ग्रॅम वजनाचे व 40 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे मंगळसूत्र, आठ हजार रुपये किंमतीचे 20 ग्रॅम वजनाचे चांदीचे तीन जोड व चांदीचा करदोडा असा एकूण 68 हजारांचा ऐवज लांबवला. या प्रकरणी प्रजापती यांच्या तक्रारीवरून बाजारपेठ पोलिसात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास बाजारपेठ निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार सुनील जोशी करीत आहेत.
