भुसावळातील बसस्थानकातून बस चालकाची दुचाकी लांबवली


The bus driver’s bike was stolen from the bus stand in Bhusawal भुसावळ : शहरातील रेल्वे स्थानकाजवळील चहाच्या दुकानाजवळून चोरट्यांनी बस चालकाची 20 हजार रुपये किंमतीची दुचाकी लांबवली. या प्रकरणी बाजारपेठ पोलिसात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा
प्रभाकर गबा मुळे (35, केर्‍हाळा, ता.रावेर) हे व्यवसायाने चालक असून बुधवार, 19 रोजी शहरात कामानिमित्त आल्यानंतर त्यांनी बसस्थानकाजवळील एका चहाच्या टपरीजवळ दुचाकी (एम.एच.19 सी.डी.5276) लावली होती मात्र काही वेळातच चोरट्यांनी भर दिवसा दुचाकीची चोरी केली. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर मुळे यांनी बाजारपेठ पोलीस ठाणे गाठून तक्रार दिल्यानंतर अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास नाईक तेजस पारीसकर करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !