रावेर कृउबा निवडणुकीत तीन पॅनलमध्ये होणार तिरंगी लढत


रावेर : कृषी उपन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत तीन पॅनलमध्ये तिरंगी लढत होणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत 88 उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतले असून आता बाजार समितीच्या 18 जागांसाठी 51 उमेदवार निवडणूक रींगगणात आहे.
कृषी उपन्न बाजार समितीच्या णधुमाळीला सुरुवात झाली.

88 उमेदवारांनी अर्ज घेतला मागे
गुरुवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवसापर्यंत 88 उमेदवारांनी आपला उमेदवारी मागे घेतल्याने आता 18 जागांसाठी 51 उमेदवार निवडणुकीच्या रींगणात आहे. रावेर बाजार समितीमध्ये निवडणुकीमध्ये पहिले महाविकास आघाडीचे शेतकरी विकास पॅनल दूसरे भाजपा सेनेचे लोकमान्य शेतकरी पॅनल आणि तिसरे परीवर्तन शेतकरी पॅनल यांच्यात तिरंगी लढत होणार आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !