वेल्हाळे बंडाची पाईप लाईन फोडली : तिघांविरोधात गुन्हा दाखल
Pipe line of Velhale Rebellion Broke : Case registered against three भुसावळ : वेल्हाळे शिवारातील राखेच्या बंडातून राख वाहून नेणारी पाईप लाईन गॅस कटरने कापत त्रिकूटाने 800 किलो वजनाचे पाईप कापून नेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी तिघांविरोधात वरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
तिघांविरोधात गुन्हा दाखल
दीपनगरातील कनिष्ठ सुरक्षा अधिकारी राजेश हरी तळेले (38, किन्ही, ता.भुसावळ) यांनी वरणगाव पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार, संशयित ऋषीकेश ज्ञानदेव महाजन, सुनील जोहरे व प्रसिक सुनील जोहरे (पिंपळगाव खुर्द, ता.भुसावळ) यांनी वेल्हाळा शिवारातील राखेच्या बंडातून बुधवार, 19 रोजी रात्री दोन वाजेच्या सुमारास राख वाहून नेणारी पाईप लाईन कापत आठ फूट लांबीचे व आठशे किलो लोखंडी पाईप लांबवले. तपास सहाय्यक निरीक्षक आशिषकुमार अडसुळ यांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहेत.
