खडका गावातील विवाहितेचा पाच लाखासाठी छळ : पतीसह आरोपींविरोधात गुन्हा
Harassment of a married woman in Khadka village for FIVE LAKH : Crime against the accused along with her husband भुसावळ : तालुक्यातील खडका येथील विवाहितेने व्यवसायासाठी माहेरून पाच लाख रुपये न आणल्याने तसेच घरातील कामधंदा व्यवस्थित येत नसल्याने पतीसह सासरच्यांनी छळ केला. छळ असह्य झाल्याने विवाहितेने तालुका पोलीस ठाणे गाठत तक्रार दिल्यानंतर पतीसह सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
पतीसह संशयीतांविरोधात गुन्हा दाखल
राधाबाई विनोद गायकवाड (29 उत्तरानगर, ब्रिजवाडी गावाजवळ, संभाजीनगर, ह.मु.पाण्याच्या टाकीजवळ, किन्ही रोड, खडका, ता.भुसावळ) यांच्या तक्रारीनुसार घरातील कामधंदा व्यवस्थित येत नाही तसेच व्यवसायासाठी पाच लाख रुपये न आणल्याने पतीसह सासरच्यांनी शारीरीक मानसिक छळ करीत मारहाण केली. हा प्रकार 30 ऑगस्ट 2012 ते 8 जानेवारी 2023 दरम्यान घडला. छळ असह्य झाल्याने विवाहिता माहेरी निघून आल्या. या प्रकरणी पती विनोद गुलाबसिंग गायकवाड, सासू ताराबाई गुलाबसिंग गायकवाड, सासरे गुलाबसिंग धनसिंग गायकवाड, नणंद अर्चना गुलाबसिंग गायकवाड, ज्योती गुलाबसिंग गायकवाड (उत्तरानगर, ब्रिजवाडी गावाजवळ, संभाजीनगर) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहाय्यक निरीक्षक प्रकाश वानखडे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार प्रेमचंद वसंत सपकाळे करीत आहेत.
