घरासाठी पैसे न आणणार्या पथराळेतील विवाहितेला घराबाहेर काढले : पतीसह तिघांविरोधात गुन्हा
यावल : तालुक्यातील पथराळे येथील माहेर असलेल्या एका 25 वर्षीय विवाहितेचा घर बांधकाम करण्यासाठी माहेरून पैसे आणि दागिने आणण्यासाठी पैसे न आणल्याने शारीरीक आणि मानसिक छळ करण्यात आला. पैसे न आणल्याने विवाहितेला घरातून बाहेर काढून देण्यात आले. या प्रकरणी तीन जणांविरुद्ध यावल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
तिघांविरोधात गुन्हा दाखल
पथराळे, ता.यावल येथील माहेर असलेल्या कोनिका सोपान सूर्यवंशी (25) या विवाहितेने यावल पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार तिचा विवाह सोपान भास्कर सूर्यवंशी (शिरपूर) या तरुणाशी 17 फेब्रुवारी 2014 रोजी झाला. लग्नानंतर सुरुवातीला पंधरा दिवस त्यांनी चांगले वागवले नंतर ते सासु सासर्यांपासुन पती-पत्नी विभक्त ते राहू लागले. दरम्यान घराचे बांधकाम करण्यासाठी माहेरून पैसे आणावे याकरीता पती सोपान भास्कर सूर्यवंशी, सासरे भास्कर वामन सूर्यवंशी व सासू सिंधुबाई भास्कर सूर्यवंशी (शिरपूर) या तिघांनी विवाहितेचा छळ केला व तिला मारहाण करून शिवीगाळ केली पैसे आणले नाही म्हणून तिला घरातून बाहेर काढले. या प्रकरणी विवाहितेने दिलेल्या फिर्यादीवरून यावल पोलिसात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
