वीज चोरीनंतरही दंड भरण्यास नकार : ऐनपूरातील चौघांविरोधात यावल पोलिसात गुन्हा
Refusal to pay fine even after electricity theft : Yaval police case against four in Ainpur
यावल : रावेर तालुक्यातील ऐनपूर गावात विद्युत वितरण कंपनीच्या वतीने वीज चोरीविरुद्ध धडक मोहिम राबविण्यात आली. यात चार जण वीज चोरी करतांना आढळल्याने या चौघांना त्यांनी चोरी केलेल्या विजेच्या युनिट नुसार दंडाची रक्कम आकारून नोटीस देण्यात आली मात्र या चौघांनी दंड न भरल्याने चौघांविरुद्ध यावल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

दंड न भरल्याने अखेर गुन्हा
ऐनपूर येथील विद्युत वितरण कंपनीचे सहायक अभियंता देवेंद्र महाजन सह विलास पाटील, शरद भालेराव, विष्णू कुंभार, रत्नाकर बनसोडे या पथकाने ऐनपुर या गावात वीज चोरी विरुद्ध धडक मोहिम राबवली. गावात भागवत पांडूरंग भोई, मधुकर रघुनाथ कोळी, छोटू जानकीराम कोळी व दीपक सुकलाल पवार हे चार जण वीज चोरी करतांना आढळल्योन त्यांना वीज चोरीच्या युनिटनुसार त्यांना दंडाची नोटीस बजवण्यात आली मात्र त्यांनी दंड भरला नाही. या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात सहाय्यक अभियंता देवेंद्र महाजन यांच्या फिर्यादीवरून वीज चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला.







