गहूखेड्यातील युवकाचा अति मद्य सेवनाने मृत्यू
Death of a youth in Gahukheda due to excessive alcohol consumption सावदा : रावेर तालुक्यातील गहूखेडा येथील 35 वर्षीय युवकाचा अति मद्य सेवनाने मृत्यू झाला. या प्रकरणी सावदा, ता.रावेर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. गणेश गोपाळ तायडे (गहूखेडा, ता.रावेर) असे मयताचे नाव आहे.
अकस्मात मृत्यूची नोंद
तायडे यांनी अती मद्य सेवन केल्याने त्यांना 18 रोजी जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवण्यात आले होते मात्र त्यांचा मृयू ओढवला. तपास हवालदार विजय पोहेकर करीत आहेत.
