जळगावात भाजपा बैठकीत राडा : भाजपा संघटन सरचिटणीसांना मारहाण
भुसावळ भाजपा शहराध्यक्ष व तालुकाध्यक्ष निवडीवरून वादंग : प्रा.सुनील नेवेंच्या अंगावर शाहीदेखील फेकली
जळगाव : जळगाव जिल्हा भाजपा अध्यक्षांची निवडीसाठी बाबा हरदास मंगल कार्यालयात बैठक सुरू झाल्यानंतर त्यात भुसावळ भाजपा शहराध्यक्ष व तालुकाध्यक्ष पदासाठी
इच्छूक नसलेल्यांना संधी मिळाल्यानंतर संतप्त पदाधिकार्यांनी निवड प्रक्रियेला सुरुवात झाल्यानंतर चांगलाच गोंधळ घातला तर भाजपचे संघटन सरचिटणीस प्रा.डॉ.सुनील नेवे यांना धक्काबुक्की करण्यात आली व त्यांच्या अंगावर शाहीफेक करण्यात आल्याने खळबळ उडाली. पार्टी विथ डिफरंट म्हटल्या जाणार्या पक्षाच्या बैठकीत असला प्रकार झाल्याने जिल्ह्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.
अखेर दानवेंचा काढता पाय : अनेकांच्या अंगावर उडाली शाही
जळगाव ग्रामीण जिल्हाध्यक्ष पदाच्या निवडीसाठी शुक्रवारी भाजपाने बाबा हरदास मंगल कार्यालयात बैठक बोलावली होती. या बैठकीत अचानक भुसावळ शहरातला एक गट आला. भुसावळ शहराध्यक्ष निवडीत प्रा.डॉ.सुनील नेवे यांनी मनमानी केल्याचा आक्षेप या गटाने नोंदवला. त्यांनी व्यासपीठावर शाई फेकल्याने ती प्रा.नेवे यांच्यासह रावसाहेब दानवे यांच्या पॅन्टवर तसेच आमदार सुरेश भोळे यांच्या सह इतर पदाधिकार्यांवर उडाल्याने नेत्यांची मोठी दमछाक उडाली. भाजप जिल्हाध्यक्ष निवडीच्या कार्यक्रमात थेट मंचावर शाई फेकल्याने पुन्हा एकदा अमळनेर येथे झालेल्या वादानंतर भाजप मधला अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. यावेळी व्यासपीठावर माजी मंत्री गिरीश महाजन उपस्थित होते. त्यांनी कार्यकर्त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला मात्र कार्यकर्ते काहीही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हते त्यामुळे रावसाहेब दानवे बैठकीतून निघून गेले.



