भुसावळात परशूराम जयंतीनिमित्त दुचाकी रॅली


भुसावळ  : भगवान परशुराम जयंतीच्या पूर्वसंध्येला शहरातील विविध भागातून दुचाकी रॅली काढण्यात आली. शुक्रवारी सायंकाळी पाच वाजता साईबाबा मंदिरापासून दुचाकी रॅलीला सुरूवात झाली तर तापी नदी किनारी असलेल्या भगवान परशुराम मंदिरापर्यंत रॅली आल्यानंतर तिचा समारोप करण्यात आला. यावेळी मोठ्या प्रमाणावर समाज बांधवांची उपस्थिती होती.

रॅलीत तरुणांचा सहभाग
गुरूवारी सायंकाळी सहा वाजता ब्राम्हण संघात ‘तुलसी के राम व परशुराम’ या विषयावर डॉ.जगदीश प्रसाद सूचिक यांचे व्याख्यान झाले. शुक्रवार, 21 रोजी सायंकाळी 5.30 वाजता जामनेर रोडवरील साई बाबा मंदीरापासून ते नाहाटा कॉलेज, जामनेर मार्गे तापी नदीच्या काठावर असलेल्या भगवान परशुराम मंदीरापर्यत मोटर सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले. या रॅलीत मोठ्या प्रमाणावर तरुणांचा सहभाग होता.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !