बेलसवाडी येथे महिलेचा विनयभंग करीत मारहाण : तिघांविरोधात गुन्हा
Belaswadi woman molested and beaten: Crime against three मुक्ताईनगर : तालुक्यातील बेलसवाडी येथे महिलेच्या घरात अनधिकृत प्रवेश करीत तिचा विनयभंग करीत चापटाबुक्क्यांनी तसेच लाथांनी मारहाण करण्यात आली. ही घटना 19 रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी तिघांविरोधात मुक्ताईनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
तिघांविरोधात गुन्हा
33 वर्षीय महिलेच्या तक्रारीनुसार, संशयित महेंद्र प्रकाश सावळे, रतन प्रकाश सावळे 19 रोजी अनधिकृतरीत्या घरात प्रवेश करीत तुझ्या नवर्याने आमच्याविरोधात तक्रार दिल्याने आम्हाला खूप मनस्ताप होत असल्याचे सांगत मारहाण केली तसेच एका संशयिताने तुझा शेतात येता-जाता अत्याचार करण्याची धमकी दिली. हा प्रकार सुरू असताना उज्वलाबाई सुरवाडे यांनी भांडण करू नका, अशी तंबी देवूनही संशयीतांनी ऐकले नाही. यावेळी गावातील काहींनी महिलेची संशयित आरोपींच्या तावडीतून सुटका केली. या प्रकरणी महिलेच्या तक्रारीवरून, महेंद्र व रतन सावळे या भावंडासह उज्ज्वलाबाई युवराज सुरवाडे (बेलसवाडी) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास उपनिरीक्षक प्रदीप शेवाळे करीत आहेत.
