भुसावळातील लाच प्रकरण : कोतवालासह पंटराची अखेर जामिनावर सुटका


Bhusawla bribery case: Kotwal along with punter finally released on bail भुसावळ : सातबारा उतार्‍यावर शेतकर्‍याचे नाव लावून देण्याचे काम करून देण्यासाठी 15 हजारांची लाच मागून तडजोडीअंती 12 हजार रुपयांची लाच घेताना भुसावळ सजाचे कोतवाल रवींद्र लक्ष्मण धांडे (54, रा.भुसावळ) व खाजगी कर्मचारी हरी देविदास ससाणे (44, रा.आंबेडकर नगर, भुसावळ) यांना जळगाव एसीबीने मंगळवार, 18 एप्रिल रोजी अटक केती होती. दोन दिवसांच्या पोलीस कोठडीनंतर संशयीतांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली व जामीन अर्ज दाखल करण्यात आल्यानंतर सोमवारी अतिरीक्त सत्र न्यायालयात सुनावणी होवून 20 हजारांच्या जात मुचलक्यावर दोघांची सुटका करण्यात आली. दरम्यान, दोघा संशयीतांना महिन्यातून एका सोमवारी एसीबीकडे हजेरी द्यावी लागणार आहे.

दोघा संशयीतांना अखेर जामीन
जळगाव तालुक्यातील चिंचोली येथील 34 वर्षीय तक्रारदाराकडे शेतजमीन सातबारा उतार्‍यावर नाव लावण्याचे काम मंडळाधिकारी योगीता पाटील यांच्याकडून करून देण्यासाठी संशयीत आरोपी तथा कोतवाल रवींद्र धांडे यांनी तडजोडीअंती 12 हजारांची लाच मागितली व मंगळवारी दुपारी तक्रारदार भुसावळ तहसीलमध्ये आल्यानंतर धांडे यांनी इशार्‍यानेच खाजगी इसमाकडे लाच देण्याचे सांगितल्यानंतर पथकाने पैसे स्वीकारताच दोघांना अटक केली होती. दोन दिवसांच्या कोठडीनंतर शुक्रवारी संशयीताना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली व जामिनासाठी अर्ज केल्यानंतर सोमवारची तारीख देण्यात आल्यानंतर न्यायालयाने दोघांची 20 हजारांच्या जातमुचलक्यावर सुटका केली. संशयितांतर्फे अ‍ॅड.मनीष सेवलानी, अ‍ॅड.तुषार पाटील, अ‍ॅड.अनिल कुटे यांनी काम पाहिले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !