भुसावळचे प्रा.डॉ.डी.एम.ललवाणी यांना समाजभूषण पुरस्कार
भुसावळ : शहरातील श्रीमती प.क.कोटेचा महिला महाविद्यालयाचे माजी प्रभारी प्राचार्य प्रा.डॉ.डी.एम.ललवाणी यांना तेजस फाउंडेशन, नाशिक यांच्यातर्फे औरंगाबाद येथील डॉ.मौलाना आझाद संशोधन केंद्राच्या सभागृहात राज्यस्तरीय समाजभूषण व जीवनगौरव पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. याप्रसंगी ज्येष्ठ साहित्यिक, विचारवंत प्रा.डॉ.ऋषिकेश कांबळे, औरंगाबादचे पोलीस निरीक्षक, शस्त्रागार प्रमुख डॉ.प्रल्हाद शेळके, कोल्हापूर येथील साहित्यीक, कवयित्री कुमुदिनी मधाळे, सामाजिक कार्यकर्त्या अॅड.रंजिता कोर तसेच तेजस फाउंडेशनच्या अध्यक्षा, चित्रपट, लघूपट निर्मात्या, दिग्दर्शिका व अभिनेत्री मेघा डोळस, लेखक, कवी महेंद्र तुपे यांची उपस्थिती होती.
शुभेच्छांचा वर्षाव
प्रा.ललवाणी यांनी सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक, अध्यात्मिक व मुक्या प्राण्याविषयी केलेल्या कार्याचा परामर्श घेऊन त्यांनी विविध संघटनेवर कार्यरत राहून विविध पदे भूषवून त्या संघटनांच्या नावलौकिकात भर टाकली असल्याचे महेंद्र तुपे यांनी सांगितले. प्रा.ललवाणी यांना पुरस्कार मिळाल्यानंतर त्यांच्यावर सर्वच क्षेत्रातील मान्यवरांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
