हमीभावासह पोषण आहारात हवा केळीचा समावेश

सावद्यातील केळी पीक परीषदेत विविध ठरावांना मंजुरी


Inclusion of air banana in nutritional diet with guaranteed value सावदा : केळी पिकाला हमी भाव जाहीर करावा तसेच केळीचा पोषण आहारात समावेश करावा आदी ठरावांना पहिल्या केळी परीषदेत मंजुरी देण्यात आली. केळी उत्पादकांच्या समस्यांवर चर्चा करण्यासाठी सावदा येथे पहिलीच केळी परीषद झाली. यावेळी केळीला प्रतिकिलो 18 रुपये 90 पैसे हमीभाव देण्याची मागणी करण्यात आली. महाराष्ट्र राज्य केळी उत्पादक शेतकरी संघाच्या वतीने आयोजित या परीषदेत केळी उत्पादकांच्या संदर्भात विविध ठराव मंजूर करण्यात आले.

केळीरत्न पुरस्काराने सन्मान
भालोद येथील अतुल जावळे यांना केळीरत्न पुरस्कार सावदा येथे झालेल्या केळी संघाच्या कार्यक्रमात प्रदान करण्यात आला. ज्या शेतकर्‍यांनी एकरी केळीचे 30 टनापेक्षा अधिक उत्पादन घेतले अशा 19 शेतकर्‍यांना केळीरत्न पुरस्कार देण्यात आला. यामध्ये इंदापूर तालुक्यातील शेतकरी कपिल जाचक, गणेश कदम (पंढरपूर), किशोर राणे (यावल, जळगाव), यश नराजे (तेल्हारा अकोला), विजय कोकरे (करमाळा), सुमन रणदिवे (पंढरपूर), धीरज पाटील (सोयगाव, संभाजीनगर), अभिजित पाटील (करमाळा), शिवशंकर कोरडे (तेल्हारा अकोला), नागेश चोपडे (अंदापूर), लक्ष्मण सावळे (रावेर), दत्तात्रय सजे (अहमदनगर), कन्हैया महाजन (रावेर), अतुल जावळे (यावल जळगाव), विजय पाटील (जळगाव), उत्तम पाटील (जळगाव), भालचंद्र पाटील (जळगाव), दिनेश आढाव (संग्रामपूर, बुलढाणा), म (जळगाव) यांचा सन्मान करण्यात आला.

  • केळी पीक परीषदेत हे ठराव पारीत
    केळीचा शालेय पोषण आहारामध्ये समावेश करावा
    केळीला 18 रुपये 90 पैसे असा हमीभाव मिळावा
    विमा कंपन्यांची मनमानी थांबवून शेतकर्‍यांना योग्य मोबदला मिळाव
    प्रतिबंधित असणारी औषधे, तसेच खते यापुढे कुठल्याही कृषी केंद्रामध्ये विक्रीसाठी ठेवल्यास कृषी अधिकान्यांना जबाबदार धरावे
    भाव न मिळाल्यास केळी उत्पादक संघ रस्त्यावर उतरून आक्रमक आंदोलन करणार

मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !