यावल शहरात तरुणावर मधमाश्यांचा हल्ला
A young man was attacked by bees in Yaval city यावल : शहरातील तालुका शेतकरी खरेदी-विक्री संघाच्या व्यापारी संकुलातील एका दुकानात 29 वर्षीय तरुणावर अचानक मधमाश्यांनी हल्ला केल्याने तरुणाला दुखापत झाली. तरुणाच्या पायाला मधमाश्यांनी चावा घेत दुखापत केली तर तातडीने तरुणाला ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ हलवण्यात आले. तरुणाची प्रकृती स्थिर आहे.
अचानक केला मधमाशांनी हल्ला
यावल शहरात अंकलेश्वर-बर्हाणपूर राज्य मार्गालगत तालुका शेतकरी खरेदी विक्री संघाचे व्यापारी संकुल असून या संकुलात यश एजन्सी आहे. या दुकानात किरण भिकन महाजन (29, रा.यावल) या तरुणावर अचानक मध्यमाश्यांनी हल्ला केला. सायंकाळी ही घटना घडल्याने दुकानात एकच धावपळ उडाली. तरुणास तातडीने ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. मध्यमाश्यांनी तरुणाच्या पायावर जबर हल्ला केल्याने तरुणास चालणे मुश्कील झाले. रुग्णालयात डॉ.सचिन देशमुख, अधिपरीचारीका आरती कोल्हे, बापू महाजन, संजय जधे, विजय शिंदे यांची उपचार केले. तरुणाची प्रकृती सध्या स्थिर आहे.
