राज्यातील वरीष्ठ पोलिस अधिकार्‍यांच्या पदोन्नतीने बदल्या


Transfers by promotion of senior police officers in the state मुंबई : राज्यातील विशेष पोलीस महानिरीक्षकांच्या अपर पोलीस महासंचालक श्रेणीतील पदावर पदोन्नतीने बदल्या झाल्या असून त्याबाबतचे आदेश राज्य शासनाचे सहसचिव व्यंकटेश भट यांनी मंगळवारी सायंकाळी काढले आहेत.

बदली झालेले अधिकारी व मिळालेली पदस्थापना अशी






विशेष पोलीस महानिरीक्षक सुरेश कुमार मेकला यांची अपर पोलीस महासंचालक व नियंत्रक, वैधमापन शास्त्र, महाराष्ट्र राज्य, मुंबई येथे बदली करण्यात आली आहे.

विशेष पोलीस महानिरीक्षक राजकुमार व्हटकर यांची अपर पोलीस महासंचालक, प्रशिक्षण व खास पथके, महाराष्ट्र राज्य, मुंबई येथे बदली करण्यात आली आहे.

नाशिक पोलीस अकादमीचे संचालक राजेश कुमार यांना संचालक, महाराष्ट्र पोलीस अकादमी, नाशिक येथेच पदोन्नती देण्यात आली आहे.

विशेष पोलीस महानिरीक्षक (व्हीआयपी सुरक्षा) कृष्ण प्रकाश यांची अपर पोलीस महासंचालक, फोर्स वन, महाराष्ट्र राज्य, मुंबई येथे बदली करण्यात आली आहे.

प्रधान सचिव (विशेष) संजय सक्सेना यांची गृह विभाग, मंत्रालय, मुंबई यांची अपर पोलीस महासंचालक, कायदा व सुव्यवस्था, महाराष्ट्र राज्य, मुंबई येथे बदली करण्यात आली आहे.

अपर पोलीस महासंचालक अनुप कुमार सिंह यांची प्रधान सचिव (विशेष), गृह विभाग, मंत्रालय येथे बदली करण्यात आली आहे.

पदस्थापनेच्या प्रतीक्षेतील निखील गुप्ता यांची अपर पोलीस महासंचालक, प्रशासन, महाराष्ट्र राज्य येथे नियुक्ती करण्यात आली आहे.

अपर पोलीस महासंचालक रवींद्र सिंगल यांची अपर पोलीस महासंचालक, महामार्ग सुरक्षा, महाराष्ट्र राज्य, मुंबई येथे बदली करण्यात आली आहे.

अपर पोलीस महासंचालक, फोर्स वन, महाराष्ट्र राज्य, सुखविंदर सिंह यांची मुंबई येथून अपर पोलीस महासंचालक, आर्थिक गुन्हे, महाराष्ट्र राज्य, मुंबई येथे बदली करण्यात आली आहे.

बृहन्मुंबई पोलीस उपायुक्त एस.टी.राठोड यांची अपर पोलीस आयुक्त, दक्षिण प्रादेशिक विभाग, नागपूर शहर येथे बदली करण्यात आली आहे.

विशेष पोलीस महानिरीक्षक गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे संजय दराडे यांची विशेष पोलीस महानिरीक्षक प्रशिक्षण व खास पथके, महाराष्ट्र राज्य, मुंबई येथे बदली करण्यात आली आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !