भुसावळात प्रौढाच्या हातातून मोबाईल हिसकावला : दोघांना अटक
Mobile phone snatched from adult’s hand in Bhusawal : Two arrested भुसावळ : रस्त्याने पायी चालणार्या प्रौढाच्या हातातून दोघा भामट्यांनी मोबाईल हिसकावून पळ काढल्याची घटना मंगळवारी रात्री आठ वाजता जवाहर डेअरीजवळ घडली. या प्रकरणी बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलयानंतर दोन संशयीतांना अटक करण्यात आली तसेच गुन्ह्यातील मोबाईल जप्त करण्यात आला.
पायी चालताना लांबवला मोबाईल
तक्रारदार राजू उत्तम तांबे (49, अण्णाभाऊ साठे नगर, भुसावळ) हे मंगळवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास आठवडे बाजारातील जवाहर डेअरीजवळून पायी जात असताना 20 ते 22 वयोगटातील दोघा तरुणांनी जवळ येवून तांबे यांच्या हातातील 950 रुपये किंमतीचा मोबाईल लांबवला. तपास हवालदार जितेंद्र पाटील करीत आहेत.
