अंजाळे घाटावर अपघात : डंपरच्या धडकेने दुचाकीस्वार गंभीर जखमी
Accident at Anjale Ghat : Bike rider seriously injured after being hit by a dumper यावल : तालुक्यातील अंजाळे घाटावर चहाच्या टपरी जवळ एका दुचाकीला डंपरने धडक दिल्याने दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. या अपघात प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात डंपर चालकाविरुद्ध अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला.
डंपर चालकाविरोधात गुन्हा दाखल
अंजाळे, ता.यावल येथील घाटाच्या जवळ असलेल्या चहाच्या टपरी जवळून दुचाकी चालक जात असताना दुचाकीस्वाराला डंपर (क्रमांक एम.एच.19 झेड 5180) वरील अज्ञात चालकाने मागून धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार जखमी झाला. घटनास्थळावरून जखमीस तातडीने यावल ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. येथे प्रथमोउपचार करून पुढील उपचारासाठी भुसावळात हलवण्यात आले. या प्रकरणी पुरुषोत्तम वसंत तळेले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात डंपर चालकाविरुद्ध अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक किशोर परदेशी करीत आहे.
