मुलीला परत पाठवण्याचा जाब विचारताच डोंगरदे येथे एकाला मारहाण : दोघांविरोधात गुन्हा
Assault on asking to send back girl: Crime against both यावल : तालुक्यातील डोंगरदे येथे एका 30 वर्षीय तरुणाने पाहुण्याची मुलगी परत पाठविण्याबाबत जाब विचारल्याने त्यातून वार वाढल्याने एकाला दोघांनी मारहाण करीत ठार मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी यावल पोलिसात दोन जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला.
दोघांविरोधात गुन्हा दाखल
डोंगरदे, ता.यावल या गावात दवल रायसिंग बारेला हे आले होते व त्यांनी गणेश गुरूलाल बारेला व ईना गुरलाल बारेला या दोघांना पाहूण्याच्या मुलीला परत पाठवण्याबाबत जाब विचारला व त्याचा राग येवून गणेश बारेला व ईना बारेला या दोघांनी लाठ्या-काठ्यांनी मारहाण केली व त्यांच्या डोक्यावर काठी मारून त्यांना दुखापत करीत शिविगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी दोघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला.
तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली नाईक किशोर परदेशी करीत आहे.
