कुर्‍हेपानाचे येथे आराधना भवनाचे उद्घाटन

भुसावळात ललवानी फाउंडेशनचा महाराष्ट्र दिनानिमित्त उपक्रम


Inauguration of Aradhana Bhavan at Kurhepanache भुसावळ  : रणरणत्या उन्हात पायी प्रवास करणार्‍या वाटसरूंसह वाहनधारकांची तृष्णा भागण्यासाठी ललवानी फाउंडेशनतर्फे कुर्‍हेपानाचे येथील ललवाणी फार्म परीसरात शीतल जल (पाणपोई) तसेच सर्व धर्मीयांसह जैन साधुसंतांना विहारांमध्ये विश्राम करण्यासाठी ललवाणी आराधना भवनाचे उद्घाटन आमदार संजय सावकारे यांच्याहस्ते नुकतेच करण्यात आले. या प्रसंगी स्व.मोतीभाऊ कोटेचा यांच्या तैलचित्राचे गणेश मंदिरात अनावरण करण्यात आले.

यांची कार्यक्रमास उपस्थिती
अ‍ॅड.अकील ईस्माईल, माजी नगराध्यक्ष नीळकंठ भारंबे, उद्योजक किरण महाजन, उद्योजक अनिल जैन, ताप्ती एज्युकेशन सोसायटीचे कोषाध्यक्ष संजय नाहाटा, टॅक्स कन्सल्टंट राजीव चोपडा, जैन चातुर्मास समितीचे अध्यक्ष प्रशांत कोटेचा, ललवाणी परीवाराचे अर्ध्वयु मदनलालजी ललवाणी, कुर्‍हा येथील संघपती नंदलालजी छाजेड यांची उपस्थिती होती. याप्रसंगी तैल चित्र साकारणार्‍या आशिया बुक अ‍ॅवॉर्ड विजेत्या चित्रकार रचना महाजन यांचा सन्मान करण्यात आला. आमदार संजय सावकारे व अ‍ॅड.अकिल ईस्माईल यांनी प्रा.ललवाणी यांच्या कार्याला उजाळा देत त्यांच्या कार्याचे कौतुक केले.

यांचा कार्यक्रमात सत्कार
आमदार सावकारे यांचा सत्कार मदनलाल ललवाणी, नीळकंठ भारंबे यांचा सत्कार नलीन ललवाणी, किरण महाजन यांचा सत्कार अनिल कोटेचा, राजीव चोपडा यांचा सत्कार संजय नाहाटा, अ‍ॅड.अकिल इस्माईल यांचा सत्कार आमदार संजय सावकारे, कुर्‍हा संघपती नंदलाल छाजेड यांचा सत्कार मानस ललवाणी यांनी केला. भुसावळ येथील अभ्यासू श्राविका ज्योती गादिया, लता सिसोदिया, शोभा छाजेड, रीटा छेडा, मधू लोढा, अनिता साखला, छाया कटारिया यांनी आराधना भवन ललवाणी परीवाराने निर्माण करून एक चांगली धार्मिक सुविधा ऊपलब्ध करुन दिल्याची भावना व्यक्त केली. के.नारखेडे विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक प्रा.जी.एम.महाजन, शिक्षिका वंदना भिरुड, तलाठी वैशाली मुन, स्टेट बँक अधिकारी नितीन छेडा, उद्योजक बाबूशेठ चोरडिया, केमिस्ट अतुल ताथेड, मनिष चोरडिया, सुनील सांखला, रामजी बंब, जवाहर डेअरीचे संचालक हेमंत पाटील यांनी मोतीभाऊ यांच्या तैलचित्राबाबतच्या निर्णयाचे कौतुक केले. भुसावळकर समाजसेवी कमलेश निकुंभे, भरत कोळी, किरण बोलके, कुर्र्‍हेकर जगदीश बारी, चंद्रशेखर शिंदे, बशीर भाई, जामनेरकर प्रमोद बोरा, प्रकाश बोरसे, पुंडलिक चौधरी यांनी शीतल जल उपक्रमाचे कौतुक केले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !