लग्नावरून परतणार्‍या एकाच कुटूंबावर क्रुर काळाचा घाला : अपघातात 11 जण जागीच ठार


Fatal accident in Chhattisgarh : 11 people killed in truck-car accident बालोद : भरधाव ट्रकने धडक दिल्यानंतर झालेल्या अपघातात चारचाकी वाहनातून तब्बल 11 वर्‍हाडी ठार झाले. हा अपघात छत्तीसगडमधील बालोद जिल्ह्यात बुधवारी मध्यरात्री राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 30 वर घडला. मयत सर्व एकाच कुटूंबातील सदस्य असून लग्नावरून परतताना ही घटना घडल्याचे सांगण्यात आले. मृतांमध्ये धर्मराज साहू, उषाबाई साहू, केशव साहू, तोमीन बाई साहू, लक्ष्मीबाई साहू, मिस रमा साहू, शैलेंद्र साहू, संध्या साहू, इशांत साहू, चालक दमेश ध्रुव, योगांश साहू यांचा समावेश आहे तर अपघाताला कारणीभूत असलेला ट्रक चालक पसार झाला असून त्याचा कसून शोध सुरू करण्यात आला आहे.

मृतदेह गावी पाठवण्यात येईल
सर्व मृतदेह धमतरी जिल्ह्यातील गुरुर येथील सौदी येथे ठेवण्यात आले आहेत. येथून आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात येत आहे. थोड्याच वेळात सर्व मृतदेह शवविच्छेदनानंतर त्यांच्या गावी पाठवण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी या अपघातावर शोक व्यक्त केला आहे. त्यांनी रात्री उशिरा ट्विट केले. लिहिले – दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या आत्म्यांना देव शांती देवो आणि त्यांच्या कुटुंबीयांना धैर्य देवो.





समोरून ट्रकने दिली धडक
धमतरी जिल्ह्यातील सोरेम गावातील साहू परिवार कांकेरला या ठिकाणी जात होते. बुधवारी रात्री 9.30 च्या सुमारास त्यांचे वाहन राष्ट्रीय महामार्ग-30 वरील बालोद येथील जगत्रा येथे आले असता समोरून येणार्‍या ट्रकने बोलेरो कारला जोरदार धडक दिल्याने बालकासह पाच महिला आणि चार पुरुषांचा जागीच मृत्यू झाला. पसार ट्रक चालकाचा शोध सुरू आहे.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !