जेवणासाठी मागितली लाच : नाशिक शहरातील लाचखोर सहाय्यक पोलीस निरीक्षक एसीबीच्या जाळ्यात
Bribe demanded for food : Bribery assistant police inspector in Nashik city caught in ACB’s net नाशिक : गुन्ह्याच्या तपासासाठी पुण्याला जाण्यासाठी खाजगी वाहन व जेवण खर्चासाठी तक्रारदाराकडे दहा हजार रुपयांची लाचेची मागणी करीत तडजोडीअंती सात हजार रुपयांची लाच स्वीकारताना उपनगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर गंगाराम डगळे (38) यांना बुधवारी सायंकाळी नाशिक एसीबीने अटक केल्याने लाचखोर पोलीस अधिकार्यांमध्ये खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे डगळे हे शासकीय रुग्णालयात शासकीय गणवेशात असतानाच ट्रॅप झाल्याने लाचखोर अधिकार्याला पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली.






रुग्णालय आवारात स्वीकारली लाच
सहायक पोीस निरीक्षक संशयित सागर गंगाराम डगळे (38) हे जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या आवारात बुधवारी सायंकाळी साडेसहा वाजता आल्यानंतर त्यांनी तक्रारदाराकडून लाच स्वीकारली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे सापळा अधिकारी पोलीस निरीक्षक अनिल बागुल, किरण अहिरराव, अजय गरुड यांच्या पथकाने हा सापळा नाशिक परीक्षेत्राच्या पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा यशस्वी केला. सरकारवाडा पोलीस ठाण्यात त्यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
वर्षभरापूर्वीच मिळाली पदोन्नती
संशयित डगळे यांना गेल्यावर्षीच सहायक निरीक्षक पदावर पदोन्नती मिळाली होती. काही महिन्यांपूर्वी झालेल्या बदल्यांमध्ये विशेष सुरक्षा विभागाच्या निवड यादीतसुद्धा डगळे यांचे नाव आले होते मात्र नियुक्तीचे आदेश प्राप्त झाले नसल्याने ते उपनगर पोलीस ठाण्यात कर्तव्यावर होते.
