पाचदेवळी शिवारात शेतकर्याचा अडीच लाखांचा मका आगीत खाक
A farmer’s maize worth two and a half lakhs burnt in fire in Pachdevli Shivara भुसावळ : तालुक्यातील पाचदेवळी शिवारातील शेतात शॉर्ट सर्किट झाल्याने आग लागल्याने मका व ठिबक नळ्या जळून शेतकर्याचे सुमारे अडीच लाखांचे नुकसान झाले. ही घटना मंगळवार, 2 रोजी दुपारी दिड वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी वरणगाव पोलिसात अकस्मात आगीची नोंद करण्यात आली.
शेतकर्याने केली भरपाईची मागणी
पुरूषोत्तम जानकीराम पाटील (65, करंजी, ता.बोदवड) यांचे पाचदेवळी शिवारात गट क्रमांक 70 मध्ये शेत असून मंगळवारी दुपारी दिड वाजेच्या सुमारास विद्युत तारांमध्ये घर्षण होवून शॉर्ट सर्किट होताच आग लागली. या आगीत शेतातील मका तसेच ठिबक नळ्या जळाल्याने सुमारे अडीच लाखांचे नुकसान झाले. या प्रकरणी शेतकर्याने वरणगाव पोलिसात तक्रार दिल्यावरून अकस्मात आगीची नोंद करण्यात आली. तपास सहा.निरीक्षक आशिषकुमार अडसुळ यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार मनोहर पाटील करीत आहेत.
