रेल्वे कामगारांच्या ज्वलंत समस्या सोडवा -मंत्री गुलाबराव पाटील
भुसावळ : रेल्वे कामगारांच्या ज्या समस्या असतील त्यांचा तातडीने निपटारा करा व तसेच रेल्वे कामगार युनियनच्या ज्या समस्या असतील त्यादेखील सोडवा, अशा सूचना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी शनिवारी दिले. भुसावळ भेटीवर आलेल्या पालकमंत्र्यांनी डीआरएम विवेककुमार गुप्ता यांची भेट घेत विविध विषयांवर प्रसंगी चर्चा केली. समस्यांबाबत गुप्ता यांनी लवकरच दखल घेवून समस्या सोडवू तसेच रेल कामगार सेनेला चर्चेसाठी बोलावू, असे आश्वासन दिले. यावेळी रेल कामगार सेनेचे मंडळ अध्यक्ष ललितकुमार मुथा, प्रीतम टाक, प्रदीप भुसारे, विनोद वाघे, संजय जगन्नाथ चौधरी, नरेश शर्मा, विजय तायडे, सुरेंद्र यादव, पद्मानंद तायडे, महेंद्र सोनवणे, महेश पाटील, शेख शब्बीर, अब्दुल अजीज व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
