भुसावळातील तरुणाच्या डोक्यात लोखंडी वस्तू मारून दुखापत : एकाविरोधात गुन्हा


Bhusawla youth injured by hitting iron object on head: Crime against one भुसावळ : जुन्या भांडणाच्या कारणावरून शहरातील आगाखान वाडा भागातील तरुणाच्या डोक्यात लोखंडी वस्तू मारून गंभीर दुखापत करण्यात आली. ही घटना बुधवारी रात्री पावणेबारा वाजता घडली. या प्रकरणी संशयित फरान बिस्मिल्ला तडवी (तडवीवाडा, नसरवांजी फाईल, भुसावळ) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

जुन्या भांडणाचा वाद उफाळला
सोहेल मुनाफ कुरेशी (22, आगाखान वाडा, शिवाजीनगर भुसावळ) या तरुणावर आगाखान वाडा, मटन मार्केटजवळ जुन्या भांडणाच्या कारणावरून फराज बिस्मिल्ला तडवी (रा. तडवी वाडा, भुसावळ) याने डोक्यात काहीतरी लोखंडी वस्तू मारून त्याला गंभीर दुखापत केली. ही घटना घडल्यानंतर जखमी झालेल्या सोहेलला भुसावळ ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर गुरुवारी संशयित आरोपी फराज बिस्मिल्ला तडवी याच्याविरोधात भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस नाईक निलेश चौधरी करीत आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !